पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुण्यातील कोथरूड येथील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेलांवर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे.आज दि. २७ मे २०२४ रोजी रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मधे सुमारे १०३४९ चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाइस गार्डन,कोरियडेर लिफ रेस्टोरंट,हॉटेल टेस्टी बेस्टी यावर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश बनकर बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता श्रीकांत गायकवाड,कनिष्ठ अभियंता मनोजकुमार मते,
सागर शिंदे,राहुल रसाळे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे, राठोड,हृषीकेश जगदाळे,भावेश इत्यादी स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली आहे.