बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल,तरीही बेकायदेशीर बांधकामे सुसाट
बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका सपशेल फेल
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढवा (पुणे): कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरात बेकायदेशीर बांधकामांचे प्रकार सुरू असताना पुणे महानगरपालिका (PMC) यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असूनही बिल्डर नवनाथ माने यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच आहे.

स्वामी समर्थ नगर (पठाण चौक), सर्वे नंबर ४, कोंढवा बुद्रुक येथे ८ मजली भव्य इमारत बेकायदेशीरपणे उभी करण्यात आली आहे. त्याच इमारतीच्या टेरेसवर डुप्लेक्स फ्लॅट बांधण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, हा डुप्लेक्स फ्लॅट आमदारांच्या बंधूसाठी बांधला जात असल्याचे माने यांचे लोकांना सांगणे आहे. “आमदार माझ्या सोबत आहेत, कोणी माझे काहीही वाकडे करू शकत नाही,” असे म्हणत ते स्थानिकांना धमकावत असल्याचेही समोर आले आहे.

आंबेडकर नगरमध्ये नाल्यात गौण खनिज उत्खनन

आंबेडकर नगर, कोंढवा बुद्रुक येथे एका नाल्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे ‘पुणे सिटी टाईम्स’च्या निदर्शनास आले आहे.

येथे गौण खनिज उत्खनन करून नाल्यात बांधकाम केले जात असल्याचे पुरावे आमच्या हाती आले आहेत. त्याच ठिकाणाजवळ नवीन प्लॉट घेऊन पुन्हा गौण खनिज उत्खनन सुरू करण्याची तयारी असल्याचेही समजते.

पालिका यंत्रणेवर गंभीर आरोप
बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात पुणे महानगरपालिका पूर्णपणे फेल ठरली आहे. स्वामी समर्थ नगर येथे केवळ देखावा करण्यासाठी कारवाई केल्यानंतर पुन्हा बांधकाम सुरू झाले. आंबेडकर नगरमध्येही वारंवार कारवाई न करता पालिका अधिकारी “तेरी चूप, मेरी चूप” अशी भूमिका घेत बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

जातीच्या राजकारणाचे आरोप
वानवडीतील माने वस्तीमध्येही असाच प्रकार घडला होता. तेथे बेकायदेशीर बांधकामांविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यावर नवनाथ माने यांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून जातीच्या राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पोलिस ठाण्यात अटक केल्यानंतरची अधिक माहिती
नवनाथ माने याने मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली आहेत. त्याच्याविरुद्ध महापालिकेने अनेक वेळा गन्हे दाखल केले आहेत. तरीही नवनाथ महादेव माने याने परत अवैध बांधकाम चालू केल्याने महापालिकेचे अभियंता अमोल पुंडे यांनी कोढंवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यावरुन पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता. नवनाथ माने याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
नवनाथ माने याने सार्डबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सरक्षितेबाबत उपाय योजना केल्या नाहीत. तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, आपलीपण फसवणूक झाली असेल आम्हाला कळवा..




