दहा दिवसांत सहाव्यांदा कारवाई.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल,पब मध्ये रात्री साउंड सिस्टीम वर मोठयाने संगीत वाजवले जात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पब्लीक हॉटेल येथे साउंड सिस्टीम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेल चेक केले असता, पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार,या हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने,सदर हॉटेलवर कारवाई करून २ लाख ७०हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करून,ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे.
मागील दहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन,१) कोंढवा
परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल,२) विमानतळ परिसरातील ३)मस्कटेअर्स ३)कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन ४) बंडगार्डन परीसरातील (राजाबहादुर मिल ) मिलर्स लक्झरी क्लब, ५ ) वन – ८ कम्युनबार ६) कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार अशा एकुण ६ हॉटेलवर कारवाई करुन एकुण ११ लाख,३९ हजार रुपयांचा साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक,पोलीस सह आयुक्त,रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,अमोल झेंडे,पोलीस उप आयुक्त गुन्हे,यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच अश्विनी पाटील,अनिकेत पोटे,पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे,आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने
केली आहे.