पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
सध्याच्या काळात कधी कोण काय करतील काय सांगता येत नाही तर नवीन फंडे आज जन्माला येत आहेत. पुण्यात कधी कोण कशी शक्कल लढवेल त्याचा काय नेमच नाही. असाच एक प्रकार एका प्रमीने केला आहे. प्रेयसिला व आईला खुष करण्यासाठी थेट होंड कार चोरणारा गजाआड झाला आहे.
हकीकत अशी की फिर्यादी यांनी ओएलएक्स वेबसाईटवर १५ दिवसापूर्वी होंडा अकॉर्ड, एमएच१४ बीके ७१९१ ही चारचाकी कार विक्री करणेसाठी गाडीचे फोटो अपलोड केले होते.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी फिर्यादीस इशान शर्मा नावाच्या इसमाकडून फोन आला व त्यांना सदरची गाडी खरेदी करावयाची आहे असे सांगून उदया गाडी पहाण्यासाठी येतो असे सांगीतले.
त्याप्रमाणे इशान शर्मा हा गाडी पहाण्यासाठी येवुन, सदरची गाडी पसंत आहे असे सांगुन व त्याचे आईचा दोन दिवसानंतर वाढदिवस असल्याने सदरची गाडी तीला मला भेट म्हणून दयायची आहे असे सांगून,गाडीचा व्यवहार ठरवुन, त्यासाठी इशांत शर्मा याने फिर्यादीस एक चेक दिले, गाडी घेण्यासाठी उदया येतो असे सांगीतले.गाडी घेण्यासाठी इशांत शर्मा हा २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता संत कबीर चौक, नाना पेठ, येथे आला व सदरची गाडी आईला दाखवून आणतो असे बोलून फिर्यादीचे भावास बरोबर घेवून जावुन,
आरोपी इशांत शर्मा याने गाडी घेवून पुणे युनिवर्सीटी येथे येवुन, आत मध्ये कोणाला येवू देत नाहीत,तुंम्ही गेटवरच थांबा मी माझ्या प्रेयसीला व माझ्या आईला गाडी दाखवुन आणतो असे फिर्यादी यांचे भावास सांगून त्यांना युनिवर्सीटी गेटवर उतरवुन, त्यानंतर इशांत शर्मा हा गाडी घेवून युनिर्व्हसिटी कॅम्पस मधुन पळुन गेला म्हणून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार, रहीम शेख व हेमंत पेरणे यांना गुप्त बातमी मिळाली, सदरचा इसम हा एका ठिकाणी गाडी घेवुन उभा आहे. त्यानुसार लोणारे व त्यांचे पथकाने सापळा रचुन, आरोपी इशांत शर्मा, वय-२५, रा. विमाननगर, पुणे यास ताब्यात घेवुन, त्याचेकडुन फसवणुक करुन पळवुन नेलेली महागडी होंडा कंपनीची कार जप्त करण्यात आली.
आहे.सदरची कामगिरी ही राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग.संदीपसिंह गिल्ल,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर, सतिश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग,यांचे मार्गदर्शनाखाली रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार,रहिम शेख, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे, सुभाष पिंगळे, श्याम सुर्यवंशी व कल्याण बो-हाडे यांनी केली आहे.