पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
बनावट शैक्षणिक (महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल १० वी) प्रमाणपत्र बनवणा-या टोळीवर कारवाई करून परर्दाफाश केला आहे. बातमीतादारा मार्फत गुन्हे शाखेस माहिती प्राप्त झाली की, संदीप ज्ञानदेव कांबळे, रा. सांगली हा व्यक्ती १० वी नापास विद्यार्थ्यांना १० वी पासचे प्रमाणपत्र देत आहे.त्याअनुशंगाने एक इसम, वय – २९ वर्षे, रा. पुणे या ५ वी नापास विद्यार्थ्याला बनावट ( डमी) ग्राहक म्हणून तयार करुन संदीप कांबळे यांस संपर्क करायला लावले असता संदीप कांबळे याने ६० हजार रुपये १० वी पासच्या प्रमाणपत्राला लागतील असे सांगितले. बनावट ग्राहक यांनी प्रथम दि.०९/०२/२०२३ रोजी ३९ हजार रुपये ऑनलाईन आरोपी संदीप कांबळे यास ट्रान्सफर केले. त्यानंतर १५ दिवसात प्रमाणपत्र मिळेल असे सांगितले.
पण आरोपीने सध्या १० वी व १२ वीच्या परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर लागत आहे असे सांगितले.दि.१०/०४/२०२३ रोजी आरोपी संदीप कांबळे यांनी खाजगी कामानिमीत्त स्वारगेटला येणार आहे. त्यावेळी ऊर्वरीत रक्कम तयार ठेवा असे सांगितल्याने बनावट ग्राहक यांनी रोख स्वरुपात १६ हजार रुपये आरोपीला दिले. त्यावेळी आरोपीने दि.२५/०४/ २०२३ रोजी १० वी पासचे प्रमाणपत्र सॉफ्ट कॉपीमध्ये पाठविले.
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे व पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी योग्य ती करवाई करणेबाबत आदेशीत केल्यानंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२ यांचे पथकास आरोपी संदीप कांबळे हा ३० एप्रिल २०२३ रोजी स्वारगेट या ठिकाणी येणार असल्याने त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीताने ऊर्वरीत बाकी रक्कम ५ हजार रुपये बनावट ग्राहक याच्याकडून घेवून, त्यास १० वी पासचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे दिल्यानंतर त्यास ताब्यात घेवून, स्वारगेट पो. स्टे. गुरंन. १०७/२३ भादविक. ४२०,४६७,४७१ अन्वये गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २,नारायण शिरगावकर हे करीत आहेत.
त्याचेकडे केलेल्या अधिक तपासा मध्ये आरोपी संदीप कांबळे याने कृष्णा सोनाजी गिरी,रा.बिडकीन, संभाजीनगर,अल्ताफ शेख, रा.परांडा, जि.धाराशीव व सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम, रा. संभाजीनगर यांचेकडून महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयाचे ५ प्रमाणपत्र घेतल्याचे सांगितल्याने, वरिष्ठांची परवानगी घेवुन पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील,पोलीस अंमलदार,गजानन सोनवलकर, राहुल हाळेकर, भाऊसाहेब साडेमिसे, मुलाणी यांची दोन पथके तयार करुन इतर आरोपीच्या शोधकामी रवाना करुन दि.२ मे २०२३ रोजी इतर ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत ३५ लोकांना १० वी पासचे प्रमाणपत्र दिलेबाबत तापासा मध्ये निष्पन्न झाले असुन अजुन किती लोकांना असे प्रमाणपत्र दिले आहे तसेच महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुलची वेबसाईट खरी आहे का ? का ती देखील खोटी, बनावट तयार करण्यात आली आहे याबबात तपास सुरु असून, यामध्ये अजुन कोणी आरोपींचे साथीदार आहेत याबाबत तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, (गुन्हे),अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक, शंकर पाटील, पोलीस अंमलदार, गजानन सोनवलकर, राहुल हाळेकर, भाऊसाहेब साडेमिसे, मुलाणी यांनी केली आहे.