जस्ट डायल कंपनीला राज्य ग्राहक आयोगाचा दणका; २५ हजार ८ टक्के व्याजाने देण्याचे आदेश

0
Spread the love

ब्युटी पार्लर महिलांसाठी असतानाही त्याचा क्रमांक पुरुषांना देण्यात आला?

अॅड वाजेद खान ( बिडकर) यांनी पाहिले कामकाज.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

त्रुटीयुक्त सेवा दिल्याप्रकरणी जस्ट डायल कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई पोटी २५ हजार रुपये २४ सप्टेंबर २०२० पासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी दिला आहे. याबरोबरच तक्रार अर्जाचा खर्च म्हणून ३ हजार रुपये देण्यात यावेत,असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे.

गुरुवार पेठ येथील महिलेने अॅड.वाजेद खान (बिडकर) यांच्यामार्फत जस्ट डायल कंपनीचे संचालक आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.मात्र बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.तक्रारदारांच्या कथनानुसार त्यांनी ब्युटी पार्लरच्या जाहिरातीसाठी जस्ट डायलशी एक महिन्यासाठी करार केला होता.

त्याचा मोबदला म्हणून ४ हजार २७५ रुपये दिले होते. ब्युटी पार्लर महिलांसाठी असतानाही त्याचा क्रमांक पुरुषांना देण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच त्यानंतर परवानगी न घेता हप्ता कापला. कोरोना काळात कोणतीही जाहिरात न करता मोबदला स्वीकारला. ती रक्कम परत न केल्याने कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र, जाब देणार कंपनी तसे न वागल्याने ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून ४ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली.

मात्र, जाब देणारांकडून लेखी म्हणणे मांडण्यात आले. तक्रारदार हे ग्राहक नाहीत. सेवेच्या सर्व अटी आणि शर्ती मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर
पाठविल्या आहेत. कराराचा कालावधी एक वर्षाचा असल्याने तक्रारदारांनी मागणी ई-मेल वर करून हप्ता थांबविण्याची मागणी केली होती.मात्र, त्यांना ईसीएस स्किपचे ऑप्शन दिले होते. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्रुटीयुक्त सेवा दिली नाही, सबब तक्रार रद्द करण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारदारांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचा निष्कर्ष काढत आयोगाने वरील आदेश दिला.सदरील माहिती अॅड वाजेद खान यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here