दिल्ली,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरुन पिडीत महिलांना बोलावुन चालू होते सेक्स रॅकेट; पुणे रेल्वे स्टेशन परिसरात समाजिक सुरक्षा विभागाचा छापा.

0
Spread the love

पुण्यातील पंचताराकीत हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवणा-या टोळीवर कारवाई

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

परराज्यातील मुली-महिला यांना वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवुन वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेवुन,त्यांना वेश्या व्यवसाकरीता पुरवित असलेबाबत सामजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार तुषार भिवरकर व अमित जमदाडे यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली.

त्यानंतर अशा एजंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढुन, सामाजिक सुरक्षा विभाग कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १ मे २०२३ रोजी सापळा रचुन, बनावट ग्राहक वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, एजंटने पुणे स्टेशन परीसरातील पंचताराकिंत हॉटेल येथे दोन रुम बुक करण्यास सांगितल्या.

सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुम मध्ये आल्यानंतर अचानाक छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजंटसह येरवडा परीसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून, महाराष्ट्र हौसींग सोसायटी येरवडा,


येथुन दोन पिडीत मुली व तीन एजंट मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, सदर तीन आरोपी यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२६/ २०२३, भादवि कलम ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन चार पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here