जहांगीर हॉस्पिटल मध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून तेथून रिक्षाने घरी येत असताना दीड लाखांची रक्कम विसरली रिक्षातच; मग काय काहि तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिली.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरातील जहांगीर हॉस्पिटल मध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून तेथून रिक्षाने घरी येत असताना दीड लाखांची रक्कम महिलेने रिक्षातच विसरल्याने महिला हवालदिल झाली होती. परंतु काहि तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिल्याने खडक पोलिसांचे कौतुक होत आहे. एलिझाबेथ रवी वय ४५ वर्ष राहणार भवानी पेठ यांनी १२ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या मुलीला जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.

तेथून रिक्षाने घरी येत असताना त्यांची सॅक रिक्षात विसरल्या होत्या. सदर बॅगेत एक लॅपटॉप तसेच मुलीच्या शस्त्रक्रिया करिता लागणारी दीड लाख रोख रुपयांची रक्कम होती.त्यावेळी गस्ती वरील डी.बी. पथकातील अंमलदार यांना सदर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. विशेष म्हणजे मुलीच्या शस्त्रक्रिये साठी त्यांनी कर्ज घेतले होते .आणि तीच रक्कम रिक्षात विसरल्याने त्या अतिशय हवालदिल झाल्या होत्या.

सदर महिलेवर ओढवलेला प्रसंग बघून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राऊत तसेच जाधव यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील तळेकर, चव्हाण, वाबळे,कुडले व इतर सर्व डी बी स्टाफ यांनी सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून सदर रिक्षाचा क्रमांक मिळवून मंगळवार पेठ येथून सदरची ऑटोरिक्षा चालकासह ताब्यात

घेतली व रिक्षातील लॅपटॉप व दीड लाख रोख रक्कम असलेली सॅक वरिष्ठ पोलिस निरीक्षक माने यांच्या हस्ते सदर महिलेच्या स्वाधीन करण्यात आली. उपचारासाठी कर्ज काढून आणलेली अचानक गहाळ झालेली मोठी रक्कम खडक पोलीसांनी परत मिळवून देताना दाखवलेली संवेदनशीलता व कौशल्य पाहून एलिझाबेथ रवी यांनी खडक व पुणे पोलिसांचे शतशः आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here