लोहियानगर पोलिस चौकीतील हवालदाराचा प्रताप.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
एखादा काही गुन्हा घडत असेल किंवा घडणार असेल अथवा काही अडचणी असेल नागरिकांना एकच पर्याय असतो तो म्हणजे फक्त “पोलिसच”. परंतु जेव्हा पोलिसच नागरिकांची तक्रार नोंदवून न घेता हाकलून लावत असेल तर मग सर्व सामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे? असाच एक प्रकार खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहियानगर पोलिस चौकीत घडला आहे.
रात्री चे साडेदहा अकराच्या सुमारास एक व्यक्ती लोहियानगर पोलिस चौकीत तक्रार द्यायला गेले होते. की जावई सारखच मुलीला त्रास देऊन मारहाण करत आहे व रात्री दोनतीन वाजता येऊन सासऱ्याला जिवे मारण्याची धमकी देऊन लहान मुलाला घेऊन जात असल्याने त्याच्या या त्रासाला घरचे सगळेच वैतागून शेवटी लोहियानगर पोलिसांकडे धाव घेतली. परंतु लोहियानगर पोलिस चौकीतील हवालदार दिघे यांनी तक्रार नोंदवून न घेता हाकलून लावले. त्या व्यक्तीला काही सुचत नसल्याने त्यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींना फोन लावून तक्रार घेतली जात नसल्याचे सांगितले.
त्यावेळी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी पुष्टी करण्यासाठी पोलिस हवालदार दिघे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, मी पत्रकार, मुख्यमंत्र्यांना घाबरत नाही?पत्रकार बित्रकार चालत नाही काय माझ्याकडे? कोर्टात जायचं परत यायचं नाही माझ्याकडे तीथ आग काही लागेना? मी सरळ काम करतो वाकड काम करत नाही. तक्रार दिली तर तुम्ही नाही लय मोठे झालं? तक्रार दिल्यानंतर जायचं कोर्टात नंतर माझ्याकडे याचचं नाही? त्याला बोलवलं आहे तो आला नाही तर मी काही करू शकत नाही? मी काही हडपसर ला जाऊन धरून आणू शकत नाही तो माझा अधिकार नाही? एकतर मी फोन घेत नाही कुणाचा मग मुख्यमंत्री का असेना? मी सरळ काम करतो वाकड काम करत नाही? कोणी सांगितले तर मी कुणाच ऐकत नाही परत फोन द्याच नाही माझ्याकडे?
असे पोलिसच उर्मटपणे नागरिकांना बोलत असेल तर मग सर्व सामान्य नागरिकांना कोर्टा शिवाय पर्याय उपलब्ध नाही? पोलिस हवालदार दिघे म्हणतात की मी सरळ काम करतो. परंतु सरळ काम करणाऱ्या हवालदाराला साधी तक्रार सरळ घेता आली नाही. आणि विषेश म्हणजे जेव्हा लोहियानगर पोलिस चौकीत जावायला बोलविण्यात आले तेव्हा जावाई चौकीत देखील फडफड करीत होता. हवालदार दिघे यांनी नंतर जावाईला सोडून दिल्याने पुन्हा जावाईने सासऱ्याच्या घरी जाऊन धिंगाणा घातला.
हेच का सरळ काम करणाऱ्या हवालदार दिघेंचे काम? खडक पोलिस कडक काम करत असताना देखील असे काही उर्मट पोलिस हवालदार खडक पोलिसांची आब्रु वेशीला टांगत आहे. लोहियानगर पोलिस चौकीत फक्त सेटलमेंटचीच कामे होत असल्याने नवीन डोकेदुखी नको म्हणून नागरिकांना हाकलून लावले जात असल्याची चर्चा लोहियानगर परिसरात सुरू आहे.? तर आता शिस्तबद्ध अधिकारी पोलिस उपायुक्त संदीप गिल व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने हे काय कारवाई करणार याकडे लक्ष वेधून राहणार आहे.