पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यापासून राजकीय वर्तुळात हळकंप उडाली आहे.तर AIMIM चे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार यांनी नवाब मलिक अटके प्रकरणी तोफ डागली आहे.महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं बुधवारी अटक केली.
त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ईडीच्या या कारवाईचा तीव्र
शब्दांत निषेध केला आहे.
यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उलटसुलट उमटत असताना यावरुन एमआयएम पक्षाचे खासदार “असदुद्दीन ओवैसी” यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
ओवैसी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारसभेमध्ये शनिवारी बोलताना त्यांनी समाजवादी
पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला,
आजम खान जेलमध्ये असताना अखिलेश यादव बाहेर कसे आहेत हे सांगा. सपावाल्यांनो, तुम्ही माझा सामना करु शकणार नाहीत, असे ते म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर देखील
निशाणा साधला.महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री बाहेर आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत, काय होतंय हे? असा सवाल त्यांनी केला आहे.