पुणे शहर पोलीस दलात उडाली खळबळ.
पुणे शहरातील रात्री उशिरापर्यंत चालू असणाऱ्या डिस्को पबला पाठिशी घालणा-या अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वसुली वाल्यावर पोलीस आयुक्तांची निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी न राखल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजु धोंडीबा वेंगरे यांना पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबीत केले आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी बुधवारी रात्री उशिरा निर्गमित झाल्याचे अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे.
वेंगरे हे यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात वजनदार वसुली वाले असल्याने अनेक वेळा त्या बाबतीत चर्चा ऐकायला येत होती. वेंगरे यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात झाली तरी ते वजनदार वसुली वाले म्हणूनच काम पाहत होते.
अनेक वरिष्ठांशी जवळचे संबंध असलेले वेंगरे निलंबित झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.तर काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंद्ये सुरू आहेत असं निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारवई केली जात आहे.
मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिन्याकाठी मलिदा गोळा करणारे तसेच पोलिस ठाण्याचं महत्वाचं कामकाज बघणारे वसुलीवाले राजे झाले आहेत.
मटका, जुगार वर कारवाई केली जात आहे परंतु आज मोठ्या प्रमाणावर डिस्को डान्स पब चालू असताना त्यावर मेहरबानी दाखवणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर सुध्दा कारवाईची नागरिकांकडून मागणी केली जात आहे.