घोरपडी गावात जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात चुकीची कलमे लावल्याचा आरोप? पोलिस उपायुक्तांची शिष्टमंडळाने घेतली भेट.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मारहाणीची घटना घडली होती त्या अनुषंगाने मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक भादवी कलम ३०७ व इतर गंभीर अपराधाचे गुन्हे दाखल केलेले आहेत. दाखल गुन्हे हे वस्तुस्थितीशी निगडित नसून ते केवळ मुस्लिम समुदायाच्या तरुणांची आयुष्य बरबाद करण्यासाठीच दाखल केलेले आहे.त्यामुळे सदर गुन्ह्याचा योग्य तपास होऊन अनावश्यक असलेले कलमे तात्काळ वगळण्यात यावेत अशी मागणी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे शिष्टमंडळाने केली आहे.

तसेच कायम शांत व सामाजिक सलोखा राखणारा घोरपडी परिसर जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरणासाठी कुप्रसिद्ध करण्याचा डाव या भागातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करीत आहेत.यापूर्वी देखील सदर लोकांनी लव जिहादच्या नावाखाली मोर्चा आयोजित करून सराईत गुन्हेगार व दंगल वाजवण्यात अग्रेसर असणाऱ्या लोकांना बोलावून घेऊन त्या ठिकाणी मुस्लिम समुदायाविषयी अत्यंत आक्षेपार्ह व चितावणीखोर वक्तव्य केलेली आहेत.

याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचे विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेले आहे. घोरपडी भागांमध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण करून दंगल माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकीच लोकांनी सदर किरकोळ भांडणाला धार्मिक दंगलीचे स्वरूप दिलेले आहे. व यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा संपूर्णपणे गैरवापर करून मुस्लिम समाजाबद्दल पुन्हा एकदा आक्षेपार्ह भाषा वापरून त्याचा प्रचार व प्रसार सोशल मीडिया द्वारे करून पोलिसांवर दबाव आणून हा गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर भांडणाच्या अनुषंगानेच सदरील भागातील हिंदुत्ववादी समाजकंटक व्यक्तींनी त्यांचे मोबाईल व्हाट्सअप स्टेटसवर मुस्लिम समाजा विषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने करणारे स्टेटमेंट लिहिलेले आहेत व त्याचाही प्रचार प्रसार केलेला आहे. त्यामुळे या भागातील सामाजिक सलोखा असलेले हिंदू मुस्लिम यांचे चांगले वातावरण संपुष्टात आणून या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगलीचे वातावरण करण्याचा प्रयत्न संबंधितांचा दिसून येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून संदर्भीय गुन्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून मुस्लिम तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सदर प्रकरणी पोलिस उपायुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालून या गुन्ह्यांमध्ये अनावश्यक लावण्यात आलेली कलमे तातडीने रद्द करावीत व या भागाचे सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली आहे. सदरील शिष्टमंडळात वसीम पैलवान, राहुल डंबाळे, मिनाज मेमन व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here