पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
हडपसर मध्ये अवैध धंद्यांचे पेवफुटले असतानाही हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसांचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असताना देखील पोलिसांचे हात गुन्हेगारांची कॉलर पकडण्यास कमी पडत आहे? का तर दर महिन्याला हजारोची मलाई चाखायला मिळत असल्याने गुन्हेगार मोकाट फिरून अवैध दारू,हातभटटी, मटका, पंती पाकोळी, या सारखे अनेक धंदे जन्माला घालून सर्व सामान्य नागरिकांचे वाटोळे करत आहेत.
हडपसर जुना म्हाडा मध्ये अवैध धंदे हे पोलिसांच्या आशिर्वादानेच चालू असल्याचे समाजिक कार्यकर्ते, महिला व स्थानिक नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. जुना म्हाडा मध्ये मुन्ना भाई यांचा धंदा जोमाने चालत असून आजुबाजूच्या नागरिकांनी याला विरोध केला असतानाही पोलिसांचा डोक्यावर हात असल्याने मुन्ना भाईची गाडी सुसाट निघाली आहे.
हडपसर पोलिसांना चांगलीच मलाई चाखायला मिळत असल्याने नागरिकांचा विरोधाला पोलिसांनी वाटाणाच्या अक्षता लावले आहेत. विषेश म्हणजे सदरील धंद्यांवर समाजिक सुरक्षा विभागाचे ( सासु) देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे. तातडीने कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. क्रमक्षा: