राज्य शासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिसांना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे झाले बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

राज्य शासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनाही आता ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट आदेश शासनाने काढले आहेत. राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयांत येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे.

परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी,कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. ओळखपत्राबात एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी,कर्मचारी ओळखपत्र दाखवीत देखील नाहीत.या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही असे उपरोक्त पत्र ७ मे, २०१४ रोजी च्या शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले होते.

तसेच सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी- कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.तर उपरोक्त बाबी विचारात घेता या परिपत्रकान्वये दिनांक ७ मे २०१४ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हणटले आहे.

शासकीय अधिकारी,कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबधित प्रशासकीय विभागांना पाठवावीत. संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवरणपत्रात (परिशिष्ट “अ”) सामान्य प्रशासन विभाग (प्र.सु., र. व का.) यांच्याकडे सादर करावा असे आज काढलेल्या परिपत्रकात म्हणटले आहे. आता शासकीय कार्यालयात याची अमंलबजावणी किती तत्परतेने होते हे येणारे काळच दाखवेलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here