पुराव्यानिशी तक्रार करूनही शुन्यच कारवाई.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान,
पुणे शहरात नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहने उचलणाऱ्या टोंईग व्हॅन चालकांकडून व वाहतूक पोलिसांकडून लूट होत असल्याची अनेक उदाहरणे पाहिला मिळतात. त्या बद्दल तक्रारी करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने पोलिस यंत्रणेवरून विश्वास कमी होताना दिसत आहे.
अशीच एक तक्रार महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती. पुण्यातील नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचा ठेका विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. दिवसभरात शेकडो वाहने उचलली जातात, त्यातील काही वाहनांचीच एंट्री दाखवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घातला जात आहे.
खडक वाहतूक विभाग, विश्रामबाग वाहतूक विभाग,लष्कर वाहतूक विभाग, हडपसर वाहतूक विभाग, वानवडी वाहतूक विभाग, स्वारगेट वाहतूक विभाग, शिवाजीनगर वाहतूक विभागामध्ये सर्वाधिक अफरातफर होत असल्याचे पुरावे वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ राहूल श्रीरामे यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले होते.
परंतु त्यांच्याकडूनही शुन्यच कारवाई? कारवाई न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीवर कारवाई न करता पोलीस आयुक्तांना पत्र वर्ग केल्याचे तक्रारदाराला कळविण्यात आले, तसेच राज्याचे गृहमंत्री यांना तक्रार करूनही अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
याचाच अर्थ वरिष्ठ या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वरिष्ठांनी तक्रारीची दखल गांभीर्याने घेतली असती तर आज टोइंग व्हॅन बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना काढायची वेळ आलीच नसती.
आणि संबंधितांविरुद्ध गुन्हे देखील दाखल झाले असते, नो पार्किंग मधून टोईंग केलेल्या वाहनांची रक्कम कोण कोण पचवत आहे? व त्याला हिस्सेदारी कोणाकोणाची? याची गंभीरपणे चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. टोईंग व्हॅन चालक व वाहतूक पोलिसांची अरेरावी व त्यातून होणारी लूट थांबविण्याची मागणी पुणेकरांनकडून होत आहे.
…….अशी होत होती बनवाबनवी……
” एकादी नो पार्किंग मधून दुचाकी वाहन उचलली की निश्चित केलेल्या जागेवर ठेवली जाते, तक्रारदाराने त्या ठिकाणी उभी केलेल्या वाहनांचे फोटो काढले होते, मग दुसऱ्या दिवशी त्या वाहनांची पावती झाली आहे किंवा कसे? याची पाहणी वाहतूक पोलिसांकडेच केली असता त्या उचललेल्या काही वाहनांची पावती न करता तसेच सोडल्याचे निर्दशनास आले आहे. याचाच अर्थ वाहतूक पोलीस व टोईंग व्हॅन वरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व गैरकारभार सुरू आहे. “