पुणे हडपसर सय्यदनगर मध्ये दहशतीचे वातावरण; वानवडी पोलिसांनाच गुन्हेगारांचे आव्हान?

0
Spread the love

गुन्हेगार खुले फिरत असताना एका पोलिसाच्या आशिर्वादाने गुन्हेगार मोकाट?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरात कोणही उटसुट कोणाचे मुडदे पाडत असल्याने सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सययदनगर मध्ये गुन्हेगारी फोफावली असतानाही वानवडी पोलिस कारवाईची कंबर कसत नसल्याने गुन्हेगारांनी थेट पोलिसांना आव्हानच दिले आहे.

सययदनगर मध्ये बरेच गुन्हेगार तडीपार असतानाही मोकाट फिरत असताना देखील वानवडी पोलिस कोबिंग ऑपरेशन करण्यास कमी पडले आहेत. यात काही शंकाच नाही? काही महिन्यांपूर्वी गोळीबार झाला असतानाही पोलिसांनी दकशता घेतली असती तर खूनच झाला नसताना अशी चर्चा अख्या सययदनगर मध्ये सुरू असून, एक स्थानिक पोलिसाने सययदनगर मधील गुन्हेगारांना अभय देत बाजार मांडला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मागील बातमी }}} BREAKING NEWS : पुणे हडपसर सय्यदनगर मध्ये दोन गटात तुफान राडा एकाचं जागीच मर्डर ; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आज पोलिसांना कोणीच घाबरत नसल्याचे देखील म्हटले जात आहे. वानवडी पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत आला असून त्यातून गुन्हेगारी जन्माला आली असून त्या धंद्यांतून मिळवणाऱ्या मलाईसाठी व एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या भानगडीत गुन्हेगारी वाढत आहे?

वानवडी पोलिसांनी आताच त्या पोलिसाची झाडाझडती घेऊन, लपवून राहिलेले तडीपारांची शोधमोहीम घेऊन पोलिसंचा दंडूका उगारला पाहिजे. तेव्हाच सय्यदनगर मधील नागरिक भयभीत होणार नाही व शांतता निर्माण होईल यात काही शंकाच नाही? (क्रमशः)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here