मुंढव्यातील हॉटेलमध्ये दिवसा शेफचे काम करून रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला चंदन नगर पोलिसांनी ठोकल्या बेडया; सॅमसंग स्टोअर, मोर मॉलजवळ देखील चोरी केल्याचे आले समोर

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

तक्रारदार हे काम करीत असलेले कंपनी मध्ये ठेवलेले भारतीय व परकीय चलनाचे असे मिळुन ३, लाख ७ हजार,श ४९२ रूपये ७ ऑगस्ट२०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करुन चोरुन नेल्याचे अनुषंगाने तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ३७२ / २०२३ भादंविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे याच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर तपास पथक प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम, सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला असता, आरोपी फुरकान नईम खान, वय २१, रा. शिवा पोस्ट फ्लोरा, गरक फॅक्टरी, रुमनं. ४५, ता. अलीशा, सेक्टर २९, जिल्हा पानिपत, राज्य हरियाना हा निष्पन्न झाला. त्याचा शोध घेत असताना, तो १२ ऑगस्ट २०२३ रोजी पिंपरी चिंचवड येथे मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता, त्यांने दाखल गुन्हयाचे चोरी बरोबरच, सॅमसंग स्टोअर, मोर मॉलजवळ, खराडी पुणे येथे देखील रात्रीची घरफोडी,

चोरी केली असल्याची कबुली दिली आहे व त्याने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ३५५/२०२३ भादंविक ४५७,३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने दोन्ही ठिकाणा वरुन चोरी केलेल्या भारतीय व परकीय चलानातील रक्कम पैकी काही रक्कम त्याचे ताब्यातुन जप्त करण्यात आली असुन अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परि. ४ शशिकात बोराटे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पो. उप-निरीक्षक अरविंद कुमरे, पो. उप-निरीक्षक दिलीप पालवे, पोलीस अंमलदार सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम,शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here