पुणे महानगर पालिकेत उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे महानगर पालिकेतील ठेकेदाराला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून १७ हजार रुपये लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे.
महेश तानाजी शिंदे वय-४६ असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई आज मंगळवारी केली.याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीनेतक्रार केली होती. तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकतीमध्ये पाण्याचे कनेक्शन देण्याकरता तक्रारदार यांनी पुणे महापालिकेत अर्ज केला होता.
पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महेश शिंदे याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. १७ हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले. तक्रारदार यांनी महेश शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली.
पुणे एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी महेश शिंदे यांने सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता मनपा पुणे यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून१७ हजार रुपयाची लाच मागितली.पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आरोपी महेश शिंदे याला रंगेहात पकडले आहे.