पुण्यातील रेशनिंग कार्यालयातील त्या महिला कर्मचाऱ्याविरूद्ध सामाजिक संघटनांनी पुकारले बंड,

0
Spread the love

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी का? कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत येणा-या बर्याच परिमंडळ कार्यालयात पारदर्शकतेचया नावाखाली आतून पिळवणूक होते यात काही सांगायची गरज नाही. त्याला कर्मचारी देखील कारणीभूत आहेत.

तर काही कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी थांड मांडून बसण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचे अनेक उदाहरणे अन्नधान्य वितरण कार्यालयात दियासला मिळतात, त्यासाठी राजकीय लोकांच्या उंबरठ्यावर देखील चकरावर चकरा मारायला ह्या कर्मचारी तयार असतात,

तर राजकीय दबाव आणून वरिष्ठांची बोळवण करायची हे देखील उघड डोळ्यांनी पाहिला मिळाले आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करून नागरिकांना दमबाजी करणा-या महिला कर्मचाऱ्याची पुन्हा अन्नधान्य वितरण कार्यालया व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या बदलीला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.

आशा स्वामी ह्या सद्ध्या अन्न धान्य वितरण कार्यालयात कार्यरत असून ते ई” परिमंडळ कार्यालयात क्लार्क असताना त्यांच्या विरोधात ब-याच तक्रारी दाखल होत्या.

त्यात पुरवठा निरीक्षकांच्या कामात ढवळाढवळ करणे, अधिकार नसताना नागरिकांच्या घरी जाऊन शिधापत्रिकेबाबत तपासणी करणे, परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे, पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना आतील बातम्या पुरविणे, मी बोलेन तेच झालं पाहिजे, अश्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिक तर नागरिक अधिकारी देखील वैतागले होते.

त्यांच्या विरोधात ब-याच तक्रारी पुणे जिल्हाधिकारी, उपायुक्त पुरवठा शाखा, अन्न धान्य वितरण कार्यालयात झाल्याने अखेर वरिष्ठांना ई” परिमंडळ कार्यालयातून बदलीचा निर्णय घ्यावा लागला, तर आता एका वर्षानंतर पुन्हा त्यांची बदली ब”ग”ड” परिमंडळ कार्यालयात होणार असल्याने जनहित लोकसेवा फाऊंडेशनने व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

स्वामी यांनाच पुन्हा पुन्हा परिमंडळ कार्यालयात बदली करण्याचे कारण काय? दुसऱ्या कर्मचाऱ्यांना संधी का दिली जात नाही? परिमंडळ कार्यालयात ज्याच्या जाण्याने अधिकारी व कर्मचारी ना खुश असतील तर त्यांची बदली करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न जनहित लोकसेवा फाऊंडेशनने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तर त्यांची बदली अन्नधान्य वितरण कार्यालया (एफडीओ) व्यतिरिक्त इतरत्र परिमंडळ कार्यालयात करू नये अन्यथा आंदोलन केले जाईल असेही दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

स्वामी यांची वारंवार परिमंडळ कार्यालयात बदली होत असल्याने बाकिच्या कर्मचाऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. आता या बद्दल अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here