बनावट मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड बनविणाऱ्या सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने केली अटक.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी, अवैध मार्गाने येणारे घुसखोर, समाजविघातक कृत्य करणा-या व्यक्ति तसेच लॅण्ड माफिया यांना हवालाद्वारे पैशाचे व्यवहार करणेकरीता बनावट डाक्युमेंट तयार करून देणारी टोळी कार्यरित असलेबाबत पोलीस आयुक्त यांनी सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशित केले असता त्याबाबत लागलीच अधिक सखोल चौकशी करून बनावट कागदपत्र तयार करून देणारा आरोपी कल्पेश रमेश बोहरा यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले.


त्याअनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. ११३/२०२२ भादंवि कलम- ४१७, ४२०,४६५, ४६६,४६७, ४६८,४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, कल्पेश रमेश बोहरा याचेकडून बनावट मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये लॅपटॉप, प्रिंन्टर, स्कॅनर, बनावट शिक्के बनविण्याची मशीन, ८ मोबाईल, बनावट नावांनी घेतलेली सिमकार्ड व बनावटरित्या तयार केलेले मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड, डेबिट कार्ड, बँक पासबुक, बनावट कागदपत्रे व इतर साहित्य पंचनामे करून जप्त करण्यात आले आहे.


दाखल गुन्हयामध्ये आतापर्यत १) कल्पेश रमेश बोहरा, २) उमेश जगन्नाथ बोडके (प्रॉपर्टी एजंट) वय-४७ वर्षे व्यवसाय- लॅन्ड कन्सलन्टींग रा- सुखातूर निवास, शिवाजी चौक, कल्याण, ३) अमोल गोविंद ब्रम्हे (प्रॉपर्टी एजंट) वय – ५८ वर्षे धंदा (प्रॉपर्टी एजंट) रा. मंगलमुर्ती कॉम्पलेक्स राजाराम पुलाजवळ, सिंहगडरोड पुणे, ४) सचिन दत्तात्रय जावळकर (प्रॉपर्टी एजंट) वय – ४१ वर्षे रा. इगल सोसायटी, फ्लॅट नंबर -३, कोथरुड गावठाण,

५) सय्यद तालीब हुसैन सय्यद जामिन हुसैन वय ४३ वर्षे, धंदा – कॉर्मन सर्व्हिस सेंटर चालक, खामगाव, बुलढाणा ६) प्रदिप अनंत रत्नाकर (प्रॉपर्टी एजंट) वय – ५४ वर्षे रा. रुम नं. १६, प्रभुकृपा अर्पाटमेंट, डॉ. मुजुमदार रोड, कात्रप, बदलापूर पुर्व, ठाणे ७) मोहम्मद आसिफ मोहम्मद युनुस वय ३८ वर्षे, धंदा.कॉर्मन सर्व्हिस सेंटर रा. टिळक मैदान मेमन जमातखाना जवळ,खामगाव, यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here