आरटीईच्या एडमिशन साठी नागरिकांची झाली अडचण.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, अजहर खान
शासनाने नवनवीन नियम आणून नागरिकांची कुचंबणा केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंत्रालयातून नागरिकांच्या हितासाठी नियम करण्यात येत असले तरी नियम आणून व अध्यादेश काढून मोकळे होणारे महाशय अडचणी सोडवण्यासाठी तत्पर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
असाच एक नियम काहि दिवसांपूर्वी काढण्यात आला आहे. शिधापत्रिका ऑनलाईन बारा अंकी नंबर टाकल्या शिवाय वितरित करू नये असे आदेशात म्हटले असले तरी आज पुण्यातील ११ परिमंडळ अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे.
कारण ऑनलाईन कामकाज बंद असल्याने शेकडो शिधापत्रिका देण्याचे राहून जात आहे. इते आड तेथे विहिर अशी परिस्थिती अधिका-यांची झाली आहे. काहि परिमंडळ कार्यालयात आढावा घेतला असता, ऑनलाईन साईटच बंद असल्याचे दिसून आले तर काही परिमंडळ कार्यालयात कर्मचारी प्रयत्न करून देखील सर्वर डाऊन असल्याने कामे रेंगाळली आहेत.
दिवसाभरात एकही शिधापत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने नागरिकांची व अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत बाजी वाढली आहे. मागचे दोन महिने सर्वर डाऊन असल्याने नाईलाजास्तव ऑफलाईन शिधापत्रिका द्यावा लागल्या होत्या, परंतु आता आदेशामुळे ऑनलाईन केल्याशिवाय शिधापत्रिका देता येत नाही.
परंतु दिवसेंदिवस पेंनडसी वाढत असल्याने अधिका-यांच्या तक्रारी मध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी नागरिक परिमंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालताना पाह्यला मिळत आहे.
शिधापत्रिका विहित मुदतीत मिळत नसल्याने नागरिकांनी या बाबतीत संताप व्यक्त केला असून ऑनलाईन कामकाज बंद असेल तर आम्हाला ऑफलाईन पध्दतीने शिधापत्रिका द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ऑनलाईन शिधापत्रिका देता येत नसेल तर ऑफलाईन देता येते का?
सध्या गेल्या सहा सात महिन्यांपासून सर्वर डाऊन असल्याने कामे रेंगाळली आहे. परंतु नागरिकांची कामे न थांबता शिधापत्रिका अर्ज ऑनलाईन साठी स्वतंत्र ठेऊन नागरिकांना वितरित करण्यास काही हरकत नाही. जेव्हा सर्वर सुरळीत होईल तेव्हा ते अर्ज प्रमुखाने ऑनलाईन करून घेता येईल, जेणेकरून नागरिकांची अडवणूक होणार नाही.
“एक परिमंडळ अधिकारी”