सद्दाम रफीक शेख यांची पुणे शहर युवक काँग्रेस “सरचिटणीस” पदी नियुक्ती

0
Spread the love

कुणाल राऊत यांच्या मान्यतेने पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे पद नियुक्ती कार्यक्रम पार पडला.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे सहकार नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व अनेकजणांना मदतीसाठी धावून जाणारे सद्दाम शेख यांची पुणे शहर युवक काँग्रेस “सरचिटणीस” पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

“नियुक्ती पत्र देताना विश्वजित कदम”

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मान्यतेने आज पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे पद नियुक्ती कार्यक्रम काँगेस भवन येथे पार पडला.

माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सद्दाम रफीक शेख यांची पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती पत्र देऊन युवक शहरअध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी नियुक्ती केली,

त्या वेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रभारी मितेंद्र सिंह महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस शिवराज मोरे,माजी शहरअध्यक्ष विकास लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितत पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here