अनधिकृत बांधकामाना मिळतोय अभय.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कात्रज सुखसागरनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे होत आहेत. महापालिका बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने ठराविक अवैध बांधकामांना अभय मिळत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. सर्व्हे नं १८ खंडोबा मंदिर जवळ नितीन राजपूत यांनी अवैधरित्या बंगल्याचे बांधकाम केलेले आहे.
बांधकाम विभागाने २७ डिसेंबर २०२१ ला नोटीस देण्याची कारवाई केली. पुढे राजपूत यांनी अपंग असल्याचे व महापालिका काम करत अस्सल्याचे सांगून बांधकाम सुरू ठेवले. नोटीस मिळाल्यापासून सदर अवैध बांधकाम जोमात सुरू झाले या बांधकाम मुळे इतर प्लॉट धारकांचा रस्ता बंद होत असून आगीची घटना घातडल्यास रस्ता सुद्धा नाही या स्थितीत ७०० फुटाच्या जागी २१०० फूट बांधकाम करण्यात आले आहे.
या विनापरवाना कामाविषयी भाऊ राठोड यांनी महापालिका बांधकाम विभागाकडे ऑनलाइन दोन तक्रार दिल्यासून बांधकाम विभागाने प्रोसिजर सुरू असलायचा उत्तर दिले आहे, सीएम पोर्टल वर केलेल्या तक्रारीस उप अभियंता प्रताप धायगुडे व कनिष्ठ अभियंता प्रशांत मोरे यांनी अवैध बांधकामास नोटीस दिल्याचे तक्रारीस उत्तर दिले आहे.
त्याच दिवशी हे अवैध बांधकाम पहिला मजला प्लास्टरसह पूर्ण झालेला होता. राठोड यांनी आयुक्त यांना दोन वेळा पत्र लिहून नोटीस दिल्यानंतर कारवाई होण्याऐवजी बांधकाम कसे केले आहे याची माहिती दिली.
बांधकाम विभागाकडून सुखसागरनगर भागातील अवैध बांधकामवर फेब्रुवारी रोजी मोठी कारवाई करण्यात आली. १६ अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई झाली, पण बांधकाम विभागाकडून त्या दिवशी नितीन रजपूत यांच्या बांधकाम कारवाई करण्यात आली नाही.
बांधकाम विभाग अवैध कामावर पक्षपातीपणे कारवाई करत असल्यामुळे परिसरात अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत असे तक्रारकर्ते राठोड यांनी सांगितले. या संदर्भात कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
आम्ही कारवाई केली आहे कारवाई करूनही संबंधित इसमाकडून काम चालू असेल तर नियमानुसार एम.आर. टी. पी. अॅकट नुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसांना पत्रव्यवहार केला जाईल.
प्रताप धायगुडे, उपअभियंता बांधकाम विभाग झोन २