पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज समोर राजारोसपणे विक्री केला जात होता गांजा, आजाद समाज पार्टी ने केला पर्दाफाश.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहरामध्ये ससून ललित पाटील प्रकरण ताजे असताना सर्रास पणे सिम्बॉयसिस कॉलेज समोर बेकायदेशीर रित्या कोणाचेही भीती न बाळगता बिनधास्तपणे दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा करून सार्वजनिक रित्या नामांकित महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना सर्रासपणे व्यसनाच्या आहारी लावून युवा पिढीला देशोधडीला लावून रक्कम रोख स्वरूपात व फोन पे, गुगल पे अश्या माध्यमातून रक्कम स्वीकारून सदरील धंदा हा सर्रासपणे चालू असल्याचा प्रकार पुण्यातील आझाद समाद पार्टीने उघडकीस आणला आहे.

सदरील बाब खूप गंभीर असून ललित पाटील प्रकरणात कोण कोणते मंत्री होते हा तपास अजून पूर्ण नसताना पुणे शहरातील एका नामांकित व उच्चभ्रू सोसायटया,आयटी कंपनी व विमानतळ अशा सुरक्षित ठिकाणी कोणाच्या वर्धस्ताने सर्रासपणे विक्री चालू आहे.

यासाठी आजाद समाज पार्टीने सदरील होत असलेला बेकायदेशीर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफास केला. संबंधितावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच २०२४ मध्ये आझाद समाज पार्टी पुणे शहर नशा मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here