खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महीन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेडया

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

मुंढवा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर ३६७/२०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३), १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे हा गुन्हा दाखल झालेपासुन गेले दोन महिन्या पासुन स्वतःचे अस्तीत्व लपवुन फिरत होता. काल दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मुंढवा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस महेश बोळकोटगी यांचे आदेशाने मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार महेश पाठक यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की,आरोपी अनुप ढगे हा उरुळी कांचन पुणे या ठिकाणी येणार आहे.

सदरची माहीती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली. त्यांनी लगेचच तपास पथकातील अधिकारी सपोनि संदिप जोरे यांना स्टाफसह बातमी ठिकाणी जावून आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश दिले.जोरे व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे अत्यंत शिताफिने वरील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे यास उरुळीकांचन येथील पीएमटी बस स्टॅन्ड येथे सापळा रचुन ताब्यात घेवुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी रीतेशकुमार सो,पोलीस आयुक्त पुणे शहर,रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर,रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर,ए. राजा, पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख,सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संदिप जोरे,दिनेश राणे, संतोष काळे,संतोष जगताप, महेश पाठक, झुरंगे, स्वप्नील रासकर,हेमंत पेरणे,सचिन पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here