पुण्यातील चंदननगर मध्ये मध्यरात्री निवृत्त सैनिकाच्या घरी बजरंग दलाचा गोंधळ.! तर तक्रार करूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही?

0
Spread the love

नागरिकांच्या घराची व त्यांच्याकडील कागदपत्रे तपासण्याचा अधिकार बजरंग दलाला कोणी दिला?

गोंधळाची स्थिती निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करण्यास का टाळाटाळ करत आहेत.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपूर्वी चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या अंधारात बजरंग दलाच्या काहींनी एका कुंटूबावर चाल करून हल्ला करण्याच्या तयारीत गोंधळ घातला असला तरी अद्यापही चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने या बाबतीत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

चंदननगर मध्ये दलाच्या लोकांनी बांगलादेशी असल्याचे सांगून एका निवृत्त भारतीय सैनिकाच्या घरी गोंधळ घातला. त्या संदर्भात शमशाद अली शेख यांनी तक्रार करूनही अद्यापही त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे शमशाद यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

त्या म्हणाल्या की माझे आजोबा,काका भारतीय सैन्यदलात होते. त्यांनी १९७१ साली पाकिस्तान विरोधात कारगिलच्या वेळी जंग लढली आहे. भारत देश हे आमचं आहे आणि या देशासाठी एवढं करूनही आम्हाला भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागत आहे. ही शरमेची बाब आहे.

तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एका वृत्तपत्राताच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, शहरातील काही संघटनांचे कार्यकर्ते चंदन नगर मध्ये रात्री जमल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या जागेवर पोलीस पाठवले. खबरदारी म्हणून संबंधित कुंटूबियांना पोलीस ठाण्यात आणून आधार कार्ड तपासले रात्री दीडला त्यांना घरी पाठवले. घोषणा देणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा असे न करण्याची समज दिली आहे अद्याप गुन्हा दाखल केले नाही.

यावर मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला असून ते म्हणाले की, आम्ही असा प्रकार केला असता तर संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांनी आम्हाला तोंडी समज देऊन सोडून दिले असते का? तसेच गुन्हा दाखल न करता आम्हाला घरी जाऊन दिले असते का? असे प्रश्न विचारून निषेध व्यक्त केला आहे. या पुण्यासारख्या संस्कृती असलेल्या शहरात असे प्रकार घडत असतील व वरिष्ठ त्यांना खतपाणी घालत असतील तर सर्व सामान्य बाबतीत कसे कार्य कर्तव्य पार पाडले जातात हे यांच्यातून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here