बेकायदेशीर होर्डिंगवर जाहिराती, पालिका अधिकाऱ्यांचा अक्कल शुन्य कारभार?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुण्यातील कोंढवा परिसरात बेकायदेशीर होर्डिंगचे जाळे वाळता वाळता वाळत असल्याने पालिकेच्या अधिकारी व परवाना निरीक्षक डोळ्यांवर ” मिस्टर इंडिया ” चा चष्मा लावून बसलेत. कोंढवा खुर्द कौसरबाग वेलकम हॉल चौक, कापरे मळा, एन.आय.बी.एम रोडवर बेकायदेशीरपणे होर्डिंग उभारली जात असल्याची तक्रार पुणे सिटी टाईम्सने काही महिन्यांपूर्वी वरिष्ठांकडे केल्याने सदरील होर्डिंग तातडीने कारवाई करण्यात आली होती.
परंतु आता पुन्हा होर्डिंगचे जाळे निर्माण करून बेकायदेशीररीत्या जाहिराती चालवून पुणे महानगर पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे.
मागील बातमी }}}} कोंढव्यात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई कधी? घाटकोपर सारखं कोंढव्यात जीव जाण्याची पुणे महानगर पालिका वाटत पाहत आहे का?
पालिकेच्या महसूलावर डल्ला मारले जात असतानाही पालिकेचे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी फक्त कुंभकर्णाची झोप घेत आहे. त्यांना फक्त मलाई भेटली तर बास..? बाकी काही देणेघेणे नाही.
चालू द्या जसं चाललं तसं? असं म्हणत इमानदारीने कामे करत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी येरवड्यात परवाना निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. त्या सारखी कारवाई आता आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संतोष वरूले करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




