तक्रारदारावर पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
१० जुन रोजी होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चोधरा भूमिपूजन कार्यक्रमातील कालिचरण महाराज यांच्या सहभागाविषयी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढणार व जातीय तेढ निर्माण होऊनये यासाठी काही सामाजिक व राजकीय पक्षांनी कोंढवा पोलिसांना साखळे घातले आहे.उद्या १० जुन २०२३ रोजी कात्रज कोंढवा रोड इस्कॉन चौक येथे माजी आमदार योगेश टिळेकर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौधरा भुजीपूजन प्रसंगी तथाकथीत हिंदुत्ववादी कालिचरण महाराज येणार असल्याचे बॅनर झळकत आहे.
कालिचरण महाराज हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून २०२२ मध्ये धर्मसंसदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी खालच्या जाऊन अनुउद्गार काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भडकाऊ भाषणे करण्याचा त्यांचा पूर्वेइतिहास आहे. या व्यक्तीमुळे कोंढवा बुद्रुक व परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच या वादग्रस्त व्यक्तीमुळे धार्मिक तेढ निर्माण केला जाऊ शकतो. सद्यस्थितीता कोल्हापूर येथे दोन दिवसापूर्वी घडलेल्या धार्मिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर कालिचरण महाराजाच्या काहीतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकतर आपण या कार्यक्रमासाठी घेण्यास कालिचरण महाराज यांना मज्जाव करावा अन्यथा सदर कार्यक्रमात फसतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यास निर्बंध घालावेत त्यांच्या भाषणाची पोलीस दलामार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जावी.
तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांनाही याबाबतीत कसलाही धार्मिक तेढ निर्माण करणारी व्यक्तव्ये कालिचरण महाराज कडून होणार नाहीत पासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सांगावे.उपद्वी कालिचरण महाराज कडून कसलेही चुकीचे वर्तन घडत्यास तसेच त्यामुळे भविष्यात कोंढवा बुद्रुक, परिसर व पुणे शहरातील सामाजिक स्वास्थ्य विघडल्यास त्यास सर्वस्वी पणे आयोजक म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर तसेच पोलीस प्रशासन जबाबदार राहतील. अशी मागणी पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस दादाश्री शशिकांत कामठे यांनी कोंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.