बदल्यांचे आदेशामध्ये खातेप्रमुखांनी परस्पर फेरबदल केल्यास कार्यवाहीसाठी तयार रहा ; अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे.

0
Spread the love

आज काढलं अतिरिक्त आयुक्तांनी कार्यालयीन आदेश.

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, पुणे महानगर पालिकेमध्ये बदल्यांन बाबतीत अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळत असते तर त्यात आपल्या खास माणसाची बदली होऊ नये यासाठी देखील अनेक अधिकारी, खातेप्रमुख खाटा टोप करताना दिसतात, यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर दुजभाव केला जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.

तर बदल्यांचे धोरणाला खो दिले जात होते. यावर आता पुणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कार्यालयीन आदेश काढून खाते प्रमुखांची खान उघडणी केली आहे.पुणे महानगरपालिका प्रशासना कडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी,कर्मचारी यांच्या
नियतकालिक बदल्यांचे धोरण महापालिका सभेने ठरावान्वये मंजूर केलेले आहे.

तर पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी ब ते श्रेणी ड मधील अधिकारी,कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे सुपूर्त केलेले आहेत. अतिरिक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख‌ बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात, खात्यात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत करतात.

खातेप्रमुखांना अधिकार नसताना बदलीचे आदेश पारित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशात परस्पर फेरबदल करणे ,वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही.तरी, सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली आज्ञापत्रानुसार, आदेशानुसार अधिकारी, कर्मचारी यांना बदलीचे खात्यात रुजू होण्यासाठी त्काळ कार्यमुक्त करावे. तसेच बदल्यांचे आज्ञापत्रामध्ये ,आदेशामध्ये खातेप्रमुख यांनी परस्पर‌ फेरबदल करू नयेत.

अशाप्रकारे फेरबदल केल्याचे बदली आज्ञापत्राची आदेशाची अंमलबजावणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्यात बाबतीत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here