क्षेत्रीय कार्यालयाच्या दिव्या खालीच अंधार.
पुणे सिटी टाईम्स PCT प्रतिनिधी, पुणे शहर हे स्मार्ट सिटी असल्याचे बोलून तोंडसुख घेतले जात असले तरी आज खरंच स्मार्ट सिटी आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटीचा डंका पिटणा-या पुणे महानगर पालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अस्वच्छतेबद्दल अनास्था दिसून आली आहे. तर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभाग असून नसून खोळंबा झाला आहे.
तर आरोग्य विभागाने स्वच्छतेचे वाभाडे काढले आहेत. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह तर आहे परंतु त्याची दुरवस्था झाली असून स्वच्छतागृहात सर्वत्र ठिकाणी घाणच घाण दिसून येत आहे. संडास तुंबली आहे तर सगळी भांडी भरलेली असल्याने नागरिकांना उलट्या करण्याची वेळ आली आहे.
सदरील ठिकाणी पाणी नाही, अस्वच्छतांमुळे कर्मचाऱ्यांना बाहेर कुठेतरी जाऊन यावे लागत आहे. तर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आपले काम होईस्तोवर टाळकत उभे राहावे लागत असून याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छतागृह साफसफाई होते किंवा नाही याची खातरजमा आरोग्य अधिकारी करत नाही का? का फक्त झोपा काढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. आरोग्याची काळजी घ्या चा नारा मिरवणाऱ्या आरोग्य विभागानेच स्वतःचीच अब्रू वेशीवर टांगली आहे.
या संदर्भात एका नागरिकाने आयुक्तांकडे तक्रार केली असून आरोग्य निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, मुकादाम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.