लाथा, बुक्के,आणि शिवागाळ करत राजेश पुराणीक यांच्याकडून मारहाण
पुणे पोलिस आयुक्त कारवाई का करत नाही? असा नागरिकांचा संतप्त सवाल
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
सारखेच चर्चेत असलेले पोलिस निरीक्षक राजेश पुराणीक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. तर काहि दिवसांपूर्वीच वॉटर पब मधील कर्मचाऱ्यांना पुराणीक यांच्याकडून मारहाणीचा प्रकार घडला होता.
तर त्यांच्या बाबतीत सोशल मिडियावर नेटिझन्सनी उलटसुलट चर्चा देखील केली. परंतु त्यांच्यावर कारवाई झाली की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणीक हे नागरिकांना लाथा,बुक्के, शिवीगाळ करून मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्या व्हिडिओत नागरिकाला बेदम मारहाण करून शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.
“सासु” ( सामाजिक सुरक्षा) म्हणत अवैध धंदे चालकांवर चांगलीच दहशत निर्माण केली असून त्या दहशतीचा चुकीचा तर वापर करत नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुराणीक हे पुणे पोलिस आयुक्तांचे खंदे समर्थक असल्याने आयुक्तांकडून त्यांच्या या कृतीकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस आयुक्त गप्प का? राजेश पुराणीक हे नागरिकांना एका बंद खोलीत मारहाण व शिवीगाळ करत असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.