तुमच्याविरुध्द कमिशनरकडे तक्रार करते,आरोपीच्या आईची धमकी.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
न्यायालयाने काढलेल्या अजामिनपात्र वारंट बजावणीसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट व शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शिवाजी पारगे वय ५४ वर्षे पोलीस अंमलदार. कोथरुड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्याचे सहकारी न्यायालय कडुन प्राप्त झालेले अजामिनपात्र वारंट आरोपीला बजावणीकामी त्याचे राहत्या पत्यावर गेले असता, आरोपीने फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्याशी झटापटी करुन त्यांना गाडीसह खाली पाडुन त्यांच्या ताब्यातुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादींनी त्यांस पकडले,
आरोपीच्या आईने फिर्यादींशी झटापटी करत मोठ-मोठयाने ओरडत व शिविगाळ करुन तुम्हाला मी पाहुन घेते अशी दमबाजी देवून तुमच्याविरुध्द कमिशनरकडे तक्रार करते असे म्हणत फिर्यादीं यांना धक्काबुकी केली. तर आरोपीला पळुन जाण्यास मदत केली आहे.
फिर्यादी हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला असून कोथरूड पोलिस ठाण्यात भादविक ३५३,२२४, २२५,१८६, ५०४,५०६,३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी करीत आहे.