पुणे शहर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर कारवाई करणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या बऱ्याच तक्रार वाढल्याने पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी वारंवार सुचना देऊनही त्याकडे वाहतूक पोलीस मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. परंतु त्या सुचनेलाच केराची टोपली वाहतूक पोलीस बिबवेवाडी मध्ये दाखवत असल्याचे दिसून आले आहे. सायंकाळी वर्दळ जास्त असल्याने वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. परंतु बिबवेवाडी चौकात उलट परिस्थिती पाहायला मिळाली.

बिबवेवाडी ओटा, गणेश चौकात सायंकाळी ६ : ४९ वाजता वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत न करता वाहनांधरून पावत्या करत असल्याचे दिसून आले. विषेश म्हणजे कंट्रोल रूम द्वारे पोलिसांना एका पेक्षा जास्त पोलिस अंमलदार थांबू नये असे आदेश असतानाही सदरील आदेशालाच वटाणाच्या अक्षता दाखवल्या गेल्या आहेत. २ महिला पोलिस व ३ पुरूष पोलिस असे पाचजण पावत्या फाडताना दिसून आल्या. त्यात विषेश म्हणजे सिग्नल सुटलेला असताना दोन्ही महिला पोलिस कर्मचारी रस्त्याचे मधोमध येऊन वाहने अडवून साईटला घेत पुरुष पोलिस कर्मचाऱ्याकडे पाठवत होते. आणि ते मस्त पावत्या फाडून हात ओले करून घेत होते.
आजूबाजूच्या नागरिकांना विचारणा केली असता सारखाच चिरीमिरीचा प्रकार पाहायला मिळत आहे? तर वाहतूक कोंडी आम्ही सोडवायची का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून संबंधित पोलिसांवर व त्यांच्या प्रमुखांवर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. आता त्यांच्यावर पोलिस उपायुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.