पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात चालयं तरी काय? एका महिला क्लार्कची बदली हडपसर रेशनिंग कार्यालयात झाल्याने डोकेदुखी नको म्हणून परिमंडळ अधिकारी थेट सुट्टीवर जाणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. हकीकत अशी की, अन्न धान्य वितरण कार्यालयातील वादग्रस्त महिला क्लार्कची बदली हडपसर येथील ड” परिमंडळ कार्यालयात अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी केल्यची चर्चा आहे. परंतु त्या महिलेचा इतिहास पाहिला तर वारंवार वादग्रस्त ठरला आहे?
ई परिमंडळ कार्यालयात ( येरवडा) येथे कार्यरत असताना रोजचीच नागरिकांशी भांडणे,परिमंडळ अधिकाऱ्यांची कामे स्वतःच करणे, पुरवठा निरिक्षकांसोबत गृहभेट देणे, तर कधी स्वतः बाई पुरवठा निरिक्षक बनणून नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करणे, महा ई सेवा चालकांसोबत साटेलोटे करणे, परिमंडळ अधिकाऱ्यांपेक्षा आवाज वरचढ करणे, नागरिकांशी रोज भांडणे करणे, अन्न धान्य वितरण कार्यालयात काहिच कामे नसताना उगाच हेलपाटे मारणे, अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे? असे अनेक कारणाने परिमंडळ अधिकारी व कर्मचारी वैतागून गेले होते.

त्या महिलेने उच्छाद मांडणल्याने वारंवार वृत्तपत्रात बातम्या व तक्रारी वाढल्याने परिमंडळ अधिकाऱ्यांना डोकेदुखी वाढली होती. तर अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना समाजिक कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. शेवटी अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांनी भीक नको कुत्र आवर म्हणत त्या वादग्रस्त महिलेची बदली करण्यात आली. परंतु पुन्हा सहा महिन्याने ब” परिमंडळ कार्यालयात येथे वसुलीबाजी करून ऑडर करून घेतली होती.
पुन्हा समाजिक कार्यकर्त्यांनी अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना आदोंलनाचा ईशारा दिल्याने ग” परिमंडळ कार्यालयाची ऑडर रद्द केली होती. आता पुन्हा वसेलीबाजी करून करून ड” परिमंडळ कार्यालयात बदली करून घेतली असल्याने ड”परिमंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भांडणतंटा नको म्हणून सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
तर काही समाजिक संघटनांनी पुणे जिल्हाधिकारी यांचे केबिन मध्ये आदोंलन करण्याचा ईशारा दिला आहे. आता यावर पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते काय निर्णय घेतात यावर लक्ष टिकून राहणार आहे.
ती वादग्रस्त महिलेला प्रत्येक वेळी परिमंडळ कार्यालयच का? इतर कर्मचारी सक्षम नाही का?
सदरील महिला वारंवार वादग्रस्त ठरली असली तरी त्या महिलेलाच वारंवार परिमंडळ कार्यालये का? वर्षानुवर्षे परिमंडळ कार्यालयात थांड मांडूनही सारखे परिमंडळ कार्यालय देण्याचे कारणे काय? यात वरिष्ठांसोबत साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होते आहे. आणि विषेश म्हणजे अन्न धान्य वितरण कार्यालयात कोणी सक्षम कर्मचारी नाही का? कित्येक वर्षांपासून एफडीओ कार्यालयात इतर कर्मचारी परिमंडळ कार्यालयाच्या प्रतिक्षेत असताना त्यांना परिमंडळ कार्यालय का दिले जात नाही? सदरील महिलेची बदली तातडीने थांबविण्याची मागणी होत असून, सदरील महिलेला कोणतेही परिमंडळ कार्यालय न देण्याची मागणी अन्न धान्य वितरण कार्यालयात जोर धरू लागली आहे.