कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब मध्ये तिरंगाच्या अवमान केल्याप्रकरणी मुंढवा पोलीसांनी दोन जणांविरोधात राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियमानुसार केला गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील फ्रेक सुपर क्लब मध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला होता.तर मुंढवा पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली.पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. सदरील घटना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे घडली होती. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तर पोलिसांकडून चौकशी सुरु होती.मुझिकल कॉन्सर्ट दरम्यान एका गायकानं मंचावर गाणं सादर करत असताना हातातील देशाचा तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला.याबाबत तक्रार मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याचा तपास मुंढवा पोलीसांनी करून गुन्हा रजि. क्र. कलम २७४ / २०२३ राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०, ११७ प्रमाणे, उमा शांती उर्फ ​​जियापीहा लॅरिना, शांती पिपल, मुझिक बैंड, व मुख्य कलाकार. कार्तिक मोरे रा. औध, पुणे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्याद तानाजी दादासाहेब देशमुख, वय ४५ वर्ष, नोकरी, पोलिस हवालदार.१४४५ नेमणुक मुंढवा पोलीस ठाणे, यांनी दिली आहे.

१४ ऑगस्ट २०२३ रोजी दरम्यान हॉटेल फ्रेक, सुपर क्लब, पिरामिड कॉप्लेक्स,सव्हे नं. ८१/८२, नॉर्थ रोड,येथे Pre Independence Day हा कार्यक्रम आयोजित करुन सदर कार्यक्रम दरम्यान शांती पिपल, मुझिक बँड मधील उमा शांती उर्फ ​​जियापीहा लॅरिना हीने स्टेजवर डान्स करीत असतांना दोन्ही हातामध्ये दोन भारतीय राष्ट्रध्वज घेवून आस्थाव्यस्त फिरवून स्टेजसमोर डान्स करीत असलेल्या पब्लीकमध्ये भिरकावून राष्ट्र ध्वजाचे अचार संहितेचा भंग करुन अवमान केला. तसेच त्यानंतर हातवारे करुन असभ्यपणाचे वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास,विलास सुतार, सहा.पोलीस निरीक्षक, संदीप जोरे,सहा.पोलीस निरीक्षक हे करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here