पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
कष्ट करून एक एक रूपये जमा करून नागरिक स्वतः साठी छत मिळावं यासाठी प्रयत्न करत असतात, तर लोन करून घरे खरेदी करत असतात, घरे तर मिळतात परंतु त्यात बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. कोंढव्यातील काही भागात रिक्षा चालवणारे, प्लंबिंग काम करणारे, छोटे छोटे काम घेणारे ठेकेदार, स्टेट एंजट, व इतर काम करणारे आज बांधकाम व्यावसायिक झाले आहे.
तर बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ मोठे आश्वासने दिली जातात,परंतु त्यावर खरे उतरताना मात्र दिसत नाही. कोंढव्यात सध्या १५ लाख १६ लाखांत सर्व सामान्य माणसाला घर मिळत असल्याने कोंढव्यात घरे खरेदी वाढली आहे. परंतु बांधकाम व्यावसायिकाकडे घर बुकिंग करून व पुर्ण पैसे देऊन ताबा घेतल्यानंतर जे माहित पडते ते धक्कादायकच आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून नागरिकांना शौचालयात फ्लॅशर,नळे,गिझर, शावर, व इतर साहित्य घरे खरेदी करताना देणे अपेक्षित असताना काही “चेंगट” बिल्डरांकडून फ्लॅशर,नळे,गिझर, शावर,ते दिले जात नाही.
नागरिकांना सांगितले जाते की तुम्ही खरेदी करा? जेव्हा नागरिक खरेदीला जातत तेव्हा १० हजाराचा भुर्दंड सहन करावा लागतो.एका इमारतीत ४० फ्लॅट असेल तर लाखों रुपये बिल्डरांच्या घशात जात आहे. एखादं नागरिक तेढ्यात शिरला तर सप्लीमेंट खाऊन बॉडी बनवणारे बिल्डर त्याच्या अंगावर धाऊन जातात, म्हणून भीक नको कुत्रा आवर म्हणयाची वेळ नागरिकांवर आली असून नागरिकांना घरे खरेदी करताना सर्व बाबी विचारात घेऊनच खरेदी करण्याचे आवाहन पुणे सिटी टाईम्सने केले आहे. तर काही तक्रारी असल्यास पुणे सिटी टाईम्सशी संपर्क 9881433883 साधावा. क्रमशः
” एकाला फ्लॅटला फक्त एकच पार्किंग “
नागरिक फ्लॅट खरेदी करताना बिल्डरांकडून पार्किंग बाबतीत बरेच “बोलबच्चन” टाकले जाते, परंतु प्रत्यक्षात घर घेतल्यावर माहिती पडते की फक्त आणि फक्त एकच दुचाकीला परवानगी दिली आहे. व तसेच फ्लॅट नंबर टाकून फक्त एक दुचाकी पार्किंग मध्ये बसेल एवढीच जागा दिली जात असल्याने ज्याच्या घरात दोन पेक्षा जास्त दुचाकी असेल, आणि ज्यांच्याकडे दुचाकी नाही परंतु रिक्षा व कार असेल तर त्यांनी वाहने कुठे पार्क करायची? इमारतीच्या बाहेर पार्क केली तर आजूबाजूच्या फ्लॅट धारकांसोबत हुज्जत होत असल्याने रस्त्यावर पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे.