पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
ओडीजी ऑफीसवरून क्लार्क बोलतोय तुमची बदली होणार आहे बदली थांबविण्यासाठी पैसे द्यावे लागेल असे सांगून येरवडा कारागृहातील महिला पोलिसाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात कारागृह महिला पोलीस अंमलदार, रा. येरवडा कारागृह कर्मचारी वसाहत,येरवडा,पुणे यांनी फिर्याद दिली आहे. ६ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांचे मोबाईल फोनवर एका अनोळखी व्यक्तींने फिर्यादी यांना ओडीजी ऑफीसवरून क्लार्क बोलतो आहे, तुमची बदली करण्यात येत आहे.
तुम्ही ज्या पाँईटला डयुटीला होता तेथील ५ ते ६ तक्रारी आल्या असुन, डयुटी पाँईटच्या ५ मुलींना सस्पेंड करण्यात येत आहे,असे असे फिर्यादी यांना सांगुन, मी सोल्युशन काढतो ओडीजी साहेबांशी बोलतो, तुंम्ही माझ्या गुगल-पे खात्यावर १० हजार रुपये ट्रान्सफर करा.
त्यावेळी फिर्यादी यांनी मी पैसे देऊ शकत नाही, त्यावर आरोपी याने तुमची ऑर्डर काढण्यात येईल, ऑर्डर टाईप करत आहे, बाकीच्या चार मुलींची ऑर्डर टाईप केली आहे असे म्हणाल्याने, फिर्यादी यांनी बदली होईल या भितीने त्या व्यक्तीच्या गुगल-पे खात्याचे क्रमांकावर १० हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. फिर्यादींची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादींनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.