पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी
पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस
निरीक्षक राजेश पुराणिक यांनी काही जणांना बंद खोलीत मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या संदर्भात एका महिलेने महिला आयोगाला तक्रार देखील केली होती. त्या संदर्भात अखेर राजेश पुराणीक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
हकीकत अशी की नागरिकांना एका खोलीत डांबून ठेवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत बुधवारी त्यांची सामाजिक सुरक्षा विभागातून उचलबांगडी केली.पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक काही नागरिकांना एका खोलीत डांबून ठेवत त्यांना फरशीवर बसविले. त्यानंतर एक एका व्यक्तीकडे वेगवेगळ्या गोष्टींची विचारणा करीत हाताने मारहाण करून लाथांनी तुडवत असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे चौकशीच्या नावाखाली दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. दरम्यान, या मारहाणीच्या प्रकरणा नंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका करण्यात येत होती. पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक हे काही लोकांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाला.
याबाबतीत एका महिलेची तक्रार राज्य महिला आयोगास प्राप्त झाली होती.यापूर्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आणि पुणे पोलिस आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.