पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर डायमंड हॉटेल जवळ नाना पेठेतील तंबाखू विक्रेत्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार झाल्यापासून पोलिस यंत्रणा कामाला लागत आरोपींचा शोध घेत असताना आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहे. तंबाखू व्यावसायिक लतेश सुरतवाला वय ५१ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-२ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुलासह ३१ जिवंत काडतुसे आणि ३ लाख ५२ हजार ५०० रूपये असा एकुण ४ लाख १९ हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली आहे.
१) भयकुमार सुबोदकुमार सिंग, सध्या रा . मार्केटयार्ड , पुणे . मुळ रा . रामदिरी गाव , बुगुसरा , मटिहाणी ठाणा , बिहार , २) नितीश कुमार रमाकांत सिंग २२ , सध्या रा . मार्केटयार्ड , मुळ रा . रामदिरी गाव , बुगुसरा , मटिहाणी ठाणा , बिहार, आणि ३) मोहमद बिलाल शेख २८ , रा. आंबेडकरनगर,गौसिया मस्जिदजवळ , मार्केटयार्ड,अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,व्यावसायिकावर फायरिंग झाल्यानंतर प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते.युनिट -२ च्या पोलिसांना फायरिंगमधील मुख्य आरोपी हे कर्नाटकातील बेंगलोर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलिस अंमलदार उत्तम तारू,उज्वल मोकाशी, लाल सरडे आणि गजानन सोनुने यांचे पथक तपासकामी बेंगलोरला रवाना झाले .
पोलिसांनी तेथून तिघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून गुन्हयात वापरलेले अग्नीशस्त्र व रोख रक्कम त्यांचा साथीदार आरोपी मोहमद बिलाल शेख याच्याकडून २ पिस्तुलासह ३१ जिवंत काडतुसे ,३ लाख ५२ हजार 500 असा एकुण ४ लाख १९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींना पुढील तपासकामी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे ,आयुक्त सुनित तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार पोलिस बिडवई, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, यांनी केली आहे.