पुण्यातील हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या ३ झिंगाट पोलिसांवर गुन्हे दाखल; पोलीस खात्यात उडाली खळबळ

0
Spread the love

हॉटेल मेट्रोमध्ये डांगडिंग करणे पडले महागात.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यात पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या ३ झिंगाट पोलिसांवर मुंढवा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय.दंड.विधान कलम ३२३,५०४,५०६ सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१)उमेश मरीस्वामी मठपती पोलिस अमंलदार फरासखाना पोलिस ठाणे रा.सदानंद नगर,सोमवार पेठ २) अमित सुरेश जाधव ३७, पोलिस अंमलदार समर्थ वाहतुक विभाग, रा. भवानी पेठ, पोलिस लाईन, आणि ३) योगेश भगवान गायकवाड ३२ पोलिस अंमलदार नेमणुक चंदननगर पोलिस ठाणे. रा. मातोश्री बिल्डींग, गणपती मंदिर समोर, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

यासंदर्भात कुनाल दशरथ मद्रे २७, धंदा – मेट्रो लॉऊज हॉटेल मॅनेजर, रा. आगवाली चाळ, लेन नं.३ गणपती मंदिर बाजुला, घोरपडीगाव यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मद्रे हे ए.बी.सी. रोड, कपिता मॅट्रीक्स बिल्डीग येथील हॉटेल मेट्रो हे बंद करून आवरा आवरीचे काम करीत होते.त्यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हे हॉटेलमध्ये आले.त्यांनी बार काऊन्टरवर दारू पिऊन आणखी दारू मागणी केली.


तसेच त्यांनी रोहित काटकर याला हाताने मारहाण करून मोठ मोठयाने शिवीगाळ केली.धमकी देऊन हॉटेल मधील बार काऊंटरवर दारू पिऊन धिंगना केला. घटनेची माहिती समजल्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे आणि उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट दिली.पुण्यातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आश्विनी भोसले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here