पुण्यातील मगरपट्टा पोलिस चौकीतील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह २ महिला पोलिस निलंबित, पोलिस उपायुक्त आर राजा यांनी काढले आदेश.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

मगरपट्टा पोलिस चौकीत काल झालेल्या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दामिनी पथकातील २ महिला पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त आर.राजा यांनी दिले आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्यात १ फेबुरवारी २०२४ रोजी भादंवि ३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या गुन्हयातील फिर्यादीने संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला ९ फेब्रुवारी २०२४ रोजी हडपसर पोलिसांनी सीआरपीसी १६० प्रमाणे नोटीस देऊन मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीकामी बोलाविण्यात आले होते.

महिला पोलिसांच्या समक्ष चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेस पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हजर राहण्याची समज देवुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आपल्याला गुन्हयामध्ये अटक होऊ शकते या भीतीमुळे संबंधित महिलेने नातेवाईकांसह मगरपट्टा पोलिस चौकीत येवुन गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असा आरोपी देखील संबंधित महिलेने केला. दरम्यान, प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाला.

त्याची दखल घेवून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनाप्रमाणे संबंधित महिलेच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली.

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, दामिनी पथकातील पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय्य चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त आर.राजा यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here