येरवडा कारागृहात कैद्याची टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या. कारागृहात उडाली खळबळ.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.

येरवडा कारागृहात कैद्याने टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. सदरील घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे.कैद्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. दरम्यान घटनेबाबत कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

मंगेश विठ्ठल भोर वय ३० मुळ रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे, असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव असून तो ओतूर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात आतमध्ये होता.

कारागृहातील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाष्टा करण्यासाठी बाहेर सोडण्यात आले. कारागृहाच्या आवारात असलेल्या ओैषध केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंगेशने टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here