पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी आणि मनसे पदाधिका-यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.संबंधितांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.शाळेच्या मुख्याध्यापकांनी यांनी मात्र आरोप फेटाळत पालकांचा गैरसमज झाल्याचं सांगितलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीतील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी सुट्टी झाल्यानंतर काही मुलांना शाळेतच ठेवून पालकांना फी भरण्यासंदर्भात सांगण्यात आले.
फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.संतप्त पालक आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून शाळेविरोधात लोणीकंद पोलीस तक्रार त्याचवेळी मनसे पदाधिकारी आणि पालक एकत्रित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात हजर झाले.त्यांना या प्रकाराचा तीव्र शब्दात जाब विचारला. पालकांचा रोष पाहता लोणीकंद पोलिसांना देखील यावेळी बोलाविण्यात आले होतं. काही पालक मुलांना घेण्यासाठी वर्गावर गेले असता त्यांना मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मुलांना पालकांच्या हवाली करण्यात आले असले तरी संतप्त पालक आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फी भरली नसल्याने मुलांना डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दाखल करुन खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना पालकांनी खड्या शब्दात जाब विचारला असता पालकांचा गैरसमज झाला असल्याचे सांगून गोंधळात न बोलता प्रत्येक पालकाशी वैयक्तिकरित्या भेटून बोलणार असल्याचे यावेळी सांगितलं.खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करा;पालकांची मागणी हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. मात्र मुख्यध्यापक त्यांच्या निर्णयावर ठाम दिसल्या. त्यानंतर पालकही संतापले आणि प्रकारसंदर्भात जाब विचारला.प्रकरण निवळत नसल्याचं पाहून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि खंडणी,अपहरणाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तक्रारीतून केली आहे.