पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे कोंढवा कौसरबाग येथील शाळेत चोरी झाल्याने कोंढवा पोलिस ठाण्यात ६८/२०२३ भादविक ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. १७ जानेवारी व १८ जानेवारी दरम्यान रायझींग स्टेपस् प्री स्कुल, गॅलेक्झी ए-१४,कौसरबाग,
कोंढवा, पुणे येथे स्कुल कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे स्कुल मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश करून,स्कुलचे ऑफिस मधील टेबलचे ड्रॉवर मध्ये ठेवलेले ३ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरी करुन नेले आहे.