पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) अजहर खान
पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत 𝘼𝙄𝙈𝙄𝙈 ने रिंगणात उडी मारल्याने लढत जोरदार होणार आहे. कसबा विधानसभा आमदार मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवड विधानसभा आमदार लक्षमण जगताप यांच्या निधनानंतर पोट निवडणूक होणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे आमदार कसबा विधानसभेतून निवडून आले आहे.आता 𝘼𝙄𝙈𝙄𝙈 ने एंट्री केल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होणार का? हे देखील पाहायला मिळेल?
तसेच २७ जानेवारी रोजी खासदार इम्तियाज जलील येणार असून उमेदवारांची यादी चेक करणार असल्याचे आज 𝘼𝙄𝙈𝙄𝙈 च्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. कसबा मध्ये काही वर्षांपासून कॉंग्रेस व भाजपाची लढाई पाहिला मिळत होती आता त्यात 𝘼𝙄𝙈𝙄𝙈 ची एंट्री झाल्याने लढतीत चुरस नक्कीच वाढणार आहे.