पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
वाहतूक पोलिसांबाबतीत नागरिकांच्या मनात प्रतिमा मलिन होत असली तरी आज वाहतूक पोलिसांनी केलेल्या कामाची कौतुक सर्व स्तरावर होत आहे. आजच्या काळात रस्त्यावर पैसे सापडले तर क्वचितच लोक परत असतील? परंतु काही प्रमाणिक वाहतूक पोलिस रस्त्यात दहा हजार सापडलेली रक्तमही संबंधीतांना शोधून परत करतात असे उदाहरण पुण्यात घडले.
हकीकत अशी की,सातारा रस्ता नातू बाग चौकात ड्यूटी करणाऱ्या पोलिस अंमलदार स्वप्निल कदम आणि सागर शिंदे यांना रस्त्याच्या कडेला एक पाकीट सापडले.पाकीट उघडून पाहिल्यावर त्यामध्ये आधार कार्ड , पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.त्यावर मुस्तफा पिरसाहब शेख, रा. सांगली, तांबवे, टी. कोरडे असे लिहिले होते.शिवाय पाकिटाच्या दुसऱ्या डब्यात दहा हजारांची रोकड होती.

एवढी मोठी रक्कम आणि तीही पुण्याच्या रस्त्यावर टाकून दिलेली आढळली आणि पाकीटातील ओळखपत्रावरून ही रक्कम सांगली जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीची आहे, त्यामुळे दोन्ही पोलिसांना ही रक्कम सहज पचवता आली असती. परंतु दोघांनीही रक्कम वाटून घेतली नाही.
त्याला फोन करून रक्कम परत केल्याने मुस्तफाचे डोळे भरून आले होते. मुस्तफाची आई दवाखान्यात असल्याने ती रक्कम ची अंत्यंत गरज होती. अश्या वेळी पैसे हरवणे आणि ते वाहतूक पोलिसांच्या हाताने परत मिळणे, यावर मुस्तफा फार खुष झाला. त्याच्या चेहऱ्यावरील खुषी पाहूनच आम्ही कुठेतरी समाजिक काम केल्याचे समाधान झाल्याची भावना स्वप्निल कदम यांनी पुणे सिटी टाईम्सशी बोलताना व्यक्त केली आहे.