माहिती अधिकारात माहिती न दिल्याने थेट जनमाहिती अधिकाऱ्यांविरुद्ध एफ.आय.आर दाखल,

0
Spread the love

माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केले स्वागत.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,

माहिती अधिकारात माहिती दिली जात नसल्याचे आज अनेक उदाहरणे पाहिला मिळतात. तर जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची मिलीभगत असल्याने माहिती नाकारण्याचे प्रमाण जास्तच आहे.

अशीच माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या विरोधात थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शासकीय यंत्रणेने मध्ये खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईतील कोनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपलब्ध न करून दिल्याने त्याच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती न दिल्याने जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध दाखल झालेला हा देशातील पहिलाच गुन्हा आहे.

कानगाव ता. पनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १६६, कलम १८८, कलम १७५, कलम १७६, कलम २१७ नुसार नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमित अरविंद काटनवरे यांनी तक्रार दाखल केली आहे.यामुळे माहिती नाकारणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा वचक बसू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामसेवकाने नियमानुसार एक महिन्याच्या आत ही माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. मात्र ग्रामसेवकांनी माहिती न दिल्याने ११ एप्रिल २०२२ रोजी काटनवरे यांनी पनवेलच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. यावर १४ एप्रिल २०२२ रोजी सुनावली ठेवली असताना ही रमेश तारेकर या सुनावणीला हजर राहिले नाहीत.

त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काटनवरे यांना ७ दिवसांच्या माहिती देण्याचे आदेश विस्तार अधिकारी यांनी दिले. मात्र तरीही ७ दिवसांच्या आत माहिती उपलब्ध न करून दिल्याने अखेर ६ जून २०२२ रोजी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात काटनवरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून या घटनेचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. यामुळे माहिती अधिकार चळवळीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here