पुणे पोलिस आयुक्तांच्या मोक्का ला सुध्दा गुन्हेगार घाबरत नसल्याचे चित्र?
पोलिसांची गुन्हेगारासोबत जवळीक पुणेकरांना घातक?
येरवडा जेल आता जेल राहिलं नाही तर गुन्हेगारांचा अड्डा बनलाय?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
पुणे शहरात गुन्हेगारांनी थैमान घातला असून दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करून खून केला जात आहे. तर शुल्क शुल्क कारणाने हत्यारे काढून दहशत माजवली जात आहे. कारण आता पुणे शहरातील प्रत्येक भागात, गल्ली बोळात चिरकुट भाई जन्माला आले आहे. पुणे शहर यापूर्वी शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख होती परंतु आता गुन्हेगारांचे शहर म्हणून नव्या ओळख निर्माण झाली आहे. रोज कुठे ना कुठे चोरी, हाणामारी, खून, गोळीबाराची घटना ऐकायला मिळते. आज गुन्हेगारांनी सुशिक्षित पुणे शहरात थैमान घातल्याने पुणेकर सध्या भीतीच्या वातावरणात राहत आहेत.
अवैध धंद्यांतून मिळणारा अमाप पैसा, संपत्ती यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. विषेश म्हणजे पोलिस आयुक्तांनी सारखा मोक्का दाखल करायचा सपाटा लावून धरला असताना गुन्हेगारी काही का असेना थांबायला तयार नाही. याचाच अर्थ गुन्हेगार मोक्काला सुध्दा घाबरत नसल्याचे दाखवून दिले आहे.
गुन्हेगारी अशीच वाढत नसून याला स्थानिक पोलिस सुध्दा जबाबदार आहे. कारण आज गुन्हेगारांसोबत पोलिसांची जवळीक वाढल्याने व त्यातून पोलिसांना मलाई मिळत असल्याने गुन्हेगारांना सुगीचे दिवस आले आहे. पोलिस आयुक्तांनी अश्या पोलिसांच्या कुंडल्या ताब्यात घेतल्यातर नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल?
पूर्वी येरवडा जेल म्हणताच गुन्हेगारांची चांगलीच फाटायची, तर आता येरवडा जेल- जेल राहिले नसून गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. कारण जेल मध्ये सगळ्या प्रकारच्या सोईसुविधा मिळत असल्याने व मोठ्या गुन्हेगारांचे चिरकुट भाईंना आश्रय मिळत असल्याने जेलची आब्रु वेशीला टांगली आहे. गुन्हेगारांचा बिमोड करायचा असेल तर गृहखात्याने कोणाचीच गय करू नये आणि पोलिस आयुक्तांनी आपल्याच पोलिस दलातील गुन्हेगारासोबत जवळीक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सफाया करून टाकावा.क्रमक्ष: