मुंढवा पोलीसांनी अग्निशस्त्र बाळगणाया आरोपीच्या आवळल्या मुसक्या, गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस केले जप्त.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.

७ नोव्हेंबर २०२३ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे मुंढवा पोलीस ठाणे हददीत येणा-या दिवाळी सणाचे अनुषंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार दिनेश राने व पोलिस शिपाई स्वप्नील रासकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की इसम आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे. हा मुंढवा पोलीस ठाणे हददीत फिरत असुन त्याचेजवळ तो गावठी पिस्टल बाळगुन आहे.

वरील मिळालेल्या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी दिल्याने मुंढवा तपास पथक अधिकारी संदीप जोरे व स्टाफ जाहांगिर चौक ते आंबेडकर चौक, घोरपडी, मुंढवा, पुणे या रस्त्यावर जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३६३ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगीरी रीतेशकुमार पोलीस आयुक्त, संदिप कर्णीक सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ, अश्विनी राख सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे,संतोष काळे, स्वप्नील रासकर, राहुल मोरे सचिन पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here