वानवडी पोलिसांसमोर गुन्हेगारांचे मुसक्या आवळण्याचे आव्हान.
अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असल्याची चर्चा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे हडपसर सय्यदनगर मध्ये गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक राहिले नसल्याची चर्चा सध्या सय्यदनगर मध्ये रंगली आहे. मोठे गुन्हेगार कुठेतरी शांत बसल्याचे दिसत असलेतरी मात्र लहान गुन्हेगार जन्माला आले आहे. यामुळे सय्यदनगर मध्ये रोज कुठे ना कुठे किरकोळ भांडण पाहायला मिळत असते?
हॉटेल मध्ये बसलेल्या एका गुन्हेगारावर अचानकपणे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.? त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख,वय २१, रा. सय्यदनगर, असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
पच्चीस याच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गुलाम खान असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.शेख हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले.
त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली.त्यात तो जखमी झाला.त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा पोलिस, उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली आहे.